scorecardresearch

Video: १० डिग्री तापमान अन् वाळंवटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

मराठी अभिनेत्रीचा वाळवंटात डान्स, व्हिडीओ व्हायरल

sonalee kulkrani dance
अभिनेत्रीचा वाळवंटात डान्स. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अप्सरा अशी ओळख मिळवलेली सोनाली अनेकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवताना दिसते. सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

अभिनेत्रीबरोबर सोनाली एक उत्तम नृत्यांगणाही आहे. नुकतंच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली वाळवंटात डान्स करताना दिसत आहे. श्रीदेवी यांच्या ‘चुडिया खनक गयी’ या गाण्यावर सोनालीने ठुमके लगावले आहेत. सोनालीबरोबर कोरिओग्राफर फुलवा खामकरही व्हिडीओत थिरकताना दिसत आहे. विशेष म्हणजे १० डिग्री तापमानात सोनाली व फुलवाने डान्स केला आहे.

हेही वाचा>> डेव्हिड वॉर्नरलाही पडली ‘पठाण’ची भूरळ; शाहरुख खानचा चेहरा एडिट करत क्रिकेटरने लावला स्वत:चा फोटो, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

सोनाली कुलकर्णीच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “१० डिग्री तापमानामध्ये नाचायची हाऊस….अर्थात फिल्मी आहोत, डान्सर्स आहोत, श्रीदेवी फॅन्स आहोत आणि मॅड तर आहोच आहोत म्हणून २०-२० रिटेक पण केल्या, तोल जात होता…घसरत होतो, पडत होतो तरी मज्जा करत होतो…”, असं कॅप्शन तिने व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

सोनालीने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘व्हिक्टोरीया’ या चित्रपटातून सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:06 IST
ताज्या बातम्या