अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. आदिनाथने आत्तापर्यंत अनेक सुपहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नुकतच आदिनाथने त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा-

लवकरच आदिनाथचा पंचक नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त त्याने मीडिया टॉक मराठी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे अनेक किस्से शेअर केले आहे. दरम्यान आदिनाथने लहानपणीची एक आठवणही सांगितली आहे.

आदिनाथ म्हणाला, “मी लहान होतो तेव्हा मला श्वानांची खूप भीती वाटायची. लक्ष्मीकांत बेर्डेंनापण श्वानांची खूप भीती वाटायची. ते माझ्या खूप जवळ होते व त्यांच्यामुळेच ही भीती माझ्यात आली. पण नंतर ती निघून गेली. पण सध्या माझी मुलगी जिजामुळे मला माझ्या सगळ्या भीतींवर मात करावी लागत आहे. त्यामुळे तिची भीती घालवण्याचा मी प्रयत्न करत असतो.”

हेही वाचा- श्रेयस तळपदेला उद्यापर्यंत मिळणार डिस्चार्ज; जवळच्या मित्राने दिली अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आदिनाथ कोठारेच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर त्याने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. फक्त मराठी मालिका आणि चित्रपट नव्हे तर बॉलीवूड चित्रपटातही तो झळकला. कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ या चित्रपटात तो झळकला. या चित्रपटात त्याने क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली होती. तसेच ‘पाणी’ हा आदिनाथ कोठारेने दिग्दर्शन केलेला पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याबरोबरच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते.