मराठी नाट्यसृष्टीमध्ये ज्यांचं अत्यंत अदबीनं नाव घेतलं जातं असे हरहुन्नरी अभिनेते भरत जाधव यांचं ‘अस्तित्व’ नाटक सध्या रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात भरत जाधव यांच्यासह चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणाऱ्या या कौटुंबिक नाटकाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अभिनेते अजिंक्य देव यांनी नुकतंच हे नाटक पाहिलं आणि त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

अभिनेते अजिंक्य देव ‘अस्तित्व’ हे नाटक पाहून म्हणाले, “आताच मी भरत जाधव एंटरटेनमेंट केलेलं ‘अस्तित्व’ हे नाटक पाहून भारावून बाहेर आलो आहे. एक खूप छान लिहिलेलं, अत्यंत छान डायलॉग आणि अत्यंत उत्कृष्ट काम यामध्ये सगळ्याच लोकांनी केलं आहेत. एक मनाला कुठेतरी लागणार, दुसरा अंक तर अंगावर आला. मला बोलताच येत नव्हतं. भरतने रडवलं, असं म्हणणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण जो आज मराठी चित्रपटसृष्टीतला विनोदाचा बादशाह आहे. खासकरून भरत जाधवला गंभीर काम करताना बघायला, लोकांना कदाचित वाटतं असेल तो कसं करू शकेल. मी तेवढ्यासाठी सर्वांना म्हणेण हे नाटक जरूर बघा. कारण हा कलाकार आहे हे सिद्ध होतं. हा फक्त विनोदवीर नाही तर कलाकार आहे. त्याने खूप सुंदर भूमिका केली आहे. डोळ्यात पाणी आणणारे त्याचे शेवटचे डायलॉग आहेत आणि ज्या पद्धतीने सादर केलंय ते अप्रतिम आहे. बाकी सहकलाकारांनी खूप छान काम केलं आहे. माझ्या हार्दिक शुभेच्छा. मी सगळ्यांना आवर्जुन सांगेण हे नाटक पाहा.” भरत जाधव यांनी अजिंक्य देव यांच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – Video: शाहरुख खानच्या लेकीच्या डान्सने वेधलं लक्ष; अफेअरच्या चर्चेदरम्यान अगस्त्य नंदाबरोबर सुहानाचा रोमँटिक डान्स

हेही वाचा – निकिता गांधीच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ६४ जखमी; गायिका शोक व्यक्त करत म्हणाली, “ही दुर्दैवी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘अस्तित्व’ या नाटकात एका अशा कुटुंबाची कथा दाखवली आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. या कुटुंबात एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची ही कथा आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत, असं दाखवण्यात आलं आहे.