अमृता खानविलकरने ‘सिनेस्टार की खोज’ या हिंदी शोमधून छोट्या पडद्यावर, तर ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. अभिनयाबरोबरच अमृता उत्तम नृत्यांगना म्हणून देखील ओळखली जाते. सतत चर्चेत राहणाऱ्या आणि सर्वांशी हसतमुखाने संवाद साधणाऱ्या अमृताची खऱ्या आयुष्यात जवळची एकच मैत्रीण आहेत. मध्यतंरी एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने एवढी वर्ष इंडस्ट्रीत काम करून माझी फक्त एकच खास मैत्रीण आहे. असं सांगितलं होतं. अमृताची ही खास मैत्रीण कोण आहे जाणून घेऊयात…

अमृता खानविलकरची गेल्या दहा वर्षापासून अभिनेत्री सोनाली खरेशी खूप चांगली मैत्री आहे. सोनालीची लेक सुद्धा अमृताला अमू मावशी म्हणून हाक मारते. आज सोनाली खरेच्या वाढदिवसानिमित्त अमृताने खास पोस्ट शेअर करत लाडक्या मैत्रिणीला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “मला सिनेमात घेतलं की…”, शिवानी सुर्वेने ‘झिम्मा २’साठी हेमंत ढोमेला पाठवलेली जन्मपत्रिका, किस्सा सांगत म्हणाली…

अमृता सोनालीसाठी लिहिते, “माय बेबी… तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. माझ्या वेडेपणाला शांतपणे सहन करणारी माझी लाडकी मैत्रीण! मला कायम समजून घेतल्याबद्दल तुझे खूप खूप आभार..तू कायम मला खंबीरपणे साथ दिलीस आणि आजच्या घडीला तू माझा सर्वात मोठा आधार आहेस. मला मैत्री या शब्दाचा अर्थ तुझ्यामुळे उमगला. तुझ्या वाढदिवशी मी एकच प्रार्थना करेन की, तुझ्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत. बेबी… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे तुला माहितीच आहे.”

हेही वाचा : रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ मंडे टेस्टमध्येही पास; चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी, लवकरच पार करणार ३०० कोटींचा टप्पा

अमृताच्या पोस्टवर सोनालीने “अमुडी मी कायम तुझ्याबरोबर आहे. आयु लव्ह यू” अशी कमेंट केली आहे. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये या दोघींच्या सुंदर बॉण्डिंगचं भरभरून कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमृता खानविलकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच अभिनेत्री ‘कलावती’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ललिता बाबरच्या बायोपिक आणि ‘पठ्ठे बाबूराव’ चित्रपटात अमृता प्रमुख भूमिकेत दिसेल.