Independence Day 2024 : आज संपूर्ण देशभरात ७८वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज फडकवला आणि देशाला संबोधित केलं. तसंच स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करून २०४७मध्ये विकसित भारताचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणार, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळींसह नेटकरी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) सुंदर सादरीकरणातून चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ हा अनोखा नृत्याविष्कार प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. याच ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ कार्यक्रमातील कलाकारांसह सुंदर सादरीकरणातून अमृता खानविलकरने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “…और मिला क्या है मुझे इस देश से”, कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अमृताने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा….तुमच्या समोर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतं आहे.” या व्हिडीओत, गेट वे ऑफ इंडिया समोर ‘वंदे मातरम’ या गाण्यावर अमृता आपल्या टीमसह डान्स करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “जान्हवी खूप भोळी आहे”, ‘बिग बॉस’मधील मैत्रिणीबद्दल मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “ती मॉडर्न दिसते पण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ च्या माध्यमातून घेऊन येत आहे. यानिमित्ताने तिचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या नृत्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल अनुभवयाला मिळणार आहे. या कलाकृतीत स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती यांचे दर्शन घडणार आहे. यात तिच्यासह नृत्यदिग्दर्शक कुशल नर्तक आशिष पाटील देखील सहभागी होणार आहे. या नृत्याविष्काराची मैफल ९० मिनिटांची असून पुढील येणाऱ्या काळात विविध नाट्यगृहात हा प्रयोग होणार आहे. येत्या २४ ऑगस्टला ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ चा पहिला प्रयोग टाटा थिएटर, एनसीपीएमध्ये सादर होणार आहे.