काही दिवसांपूर्वीच १००व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांविषयीचा एक मुद्दा अधोरेखित केला होता. तो म्हणजे टोपणनावाचा मुद्दा. “अंड्या काय, पचक्या काय, काय वाटेल ते बोलतात. तुम्ही जर तुमचा मान राखला नाही, तर लोक का तुम्हाला मान देतील?” असं म्हणत राज ठाकरेंनी कलाकारांना सुनावलं होतं. राज ठाकरेंच्या याचं मुद्द्यावर अभिनेते आनंद इंगळे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता आनंद इंगळे यांनी ‘रेडिओ सिटी मराठी’ या रेडिओ चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड चर्चेमध्ये आहात. त्यावर तुमचं मत काय? यावर आनंद इंगळे म्हणाले, “मला कळलं ते, ही गोष्ट मी फक्त तिथूनच ऐकली नाही. कारण याच्याआधीही राज साहेबांशी बोलताना अनेक वेळेला हा विषय निघाला होता. ते असं जाहीरपणे म्हणतील याचा मला सुखःद धक्का होता. ते म्हणतायत तो मुद्दा मला १०० टक्के पटतो. कोणी तरी मला माझ्या टोपणनावाने हाक मारून माझी किंमत कमी होते असं नाहीये. पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात. ही लाइन जास्त अधोरेखित करायला पाहिजे.”

हेही वाचा – Video: लाडक्या लेकीला लग्नाच्या बेडीत अडकताना पाहून आमिर खानच्या डोळ्यात पाणी, व्हिडीओ व्हायरल

पुढे अभिनेते म्हणाले, “त्याच्यावर मला पुरक मुद्दा मांडायचा आहे. हे जसं आपण कलाकारांनी पाळलं पाहिजे. तसंच वेगवेगळ्या चॅनेलवरच्या अनेक कार्यक्रमांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणंही थांबलं पाहिजे. काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका आणि अत्यंत सतत किचकिच करणारा माणूस आहे, असं विनोद म्हणून जे केलं जातं. तेव्हा मला असं वाटतं, नंतर त्याचा परिणाम वेगळा आहे. आपणच ही गोष्ट जपायला हवी. नॅशनल टेलीव्हिजनवरून जपायला हवी. वैयक्तिक आयुष्यात जपायला हवी. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राज साहेबांचं म्हणणं मला १०० टक्के पटतं.”

हेही वाचा – ‘तू चाल पुढं’ फेम अभिनेत्याने शेअर केला सेटवरचा शेवटचा दिवस, चाहती म्हणाली, “ही मालिका नसून आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आनंद इंगळे सध्या अजून एका गोष्टीमुळे चर्चेत आहेत. ते म्हणजे ‘पंचक’. ५ जानेवारीला त्यांचा हा ‘पंचक’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.