मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. सध्या ती तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सायली संजीवने तिच्या यशस्वी करिअरबद्दल सांगितले. यावेळी तिने तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या दोन व्यक्तींबद्दल सांगितले.

गोष्ट एका पैठणीची हा चित्रपटामुळे सायली संजीव ही सध्या सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटात सायली ही मुख्य भूमिकेत झळकताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सायलीने ‘महाराष्ट्र टाईम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या यशस्वी होण्यामागे दोन महत्त्वाच्या व्यक्ती असल्याचं सांगितले. हे दोन व्यक्ती म्हणजे एक तिचे वडील संजीव आणि दुसरे म्हणजे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ. सायली संजीव ही अशोक सराफ यांना वडिलांच्या समान मानते. या मुलाखतीत सायलीने त्या दोघांचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
आणखी वाचा : “होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात…” सायली संजीवने सांगितली आदेश बांदेकरांबद्दल ‘ती’ आठवण

“मी जेव्हा अभिनयाच्या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला माझ्या बाबांनी एक महत्त्वाचा आणि उपयुक्त सल्ला दिला होता. तू जे काही काम करशील ते प्रामाणिकपणे कर”, असे मला माझ्या बाबांनी सांगितले होते. विशेष म्हणजे पुढे जाऊन असाच सल्ला मला अशोक सराफ यांनी दिला.

“मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितले होते की तू जे काही काम घेतेस त्यात तुझं तू १०० टक्के योगदान दे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड कधीच करू नकोस. या दोघांनी जो मला सल्ला दिला. तो कटाक्षानं पाळण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मी जे काम करते त्यात थोडं समजून घेऊन काम करते. माझ्याकडे चालून आलेल्या कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही”, असे सायली संजीवने म्हटले.

आणखी वाचा : “आमच्या नात्यात दुरावा…” ऋतुराज गायकवाडबरोबर रिलेशनशिपच्या चर्चांना सायली संजीवने दिला पूर्णविराम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट गेल्या २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी हे दोघेही मुख्य भूमिकेत आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड हे कलाकारही झळकताना पाहायला मिळत आहे.