अभिनेत्री सुकन्या मोने कुलकर्णी या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटामुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात त्यांनी ‘साधना’ ही भूमिका साकारली आहे. सुकन्या मोने यांची चित्रपटसृष्टीत ऋजुता देशमुख, शिल्पा नवलकर, पूर्वा गोखले या अभिनेत्रींशी फार घट्ट मैत्री आहे. नुकत्याच लेट्स अप मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या मैत्रिणींबद्दल अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीला सुकन्या मोनेंसह शिल्पा नवलकरदेखील उपस्थित होत्या.

हेही वाचा : “शूटिंगला जाताना सासरचे नातेवाईक अचानक घरी आले तर…”, प्रश्नाला उत्तर देत प्रिया बापट म्हणाली, “आमच्याकडे येणारे पाहुणे…”

सुकन्या मोने आपली लाडकी मैत्रीण शिल्पा नवलकर यांच्याविषयी सांगताना म्हणाल्या, “आमच्या दोघींच्या मैत्रीला आता ४० वर्ष होऊन गेली आहेत. मी शिल्पाला आता एवढी ओळखते की, तिची प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. तिला गाडीतून प्रवास करताना मोठ्या आवाजात गाणी लावलेली आवडत नाहीत. त्यामुळे तिच्याबरोबर प्रवास करताना मी तिच्यानुसार वागते. बरं एकमेकींच्या ज्या गोष्टी पटत नाहीत त्या आम्ही तोंडावर सांगतो… एकमेकींच्या मागून कधीच चर्चा केलेली नाही.”

हेही वाचा : “माझ्या मित्रांनी पैसे न घेता…”, प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’बद्दल खुलासा; म्हणाले, “अडचणीच्या काळात…”

सुकन्या मोने पुढे म्हणाल्या, “आमच्या मैत्रिणींचा एक खास ग्रुप आहे आणि आम्हाला एकमेकींच्या बऱ्याच गोष्टी आता माहिती आहेत. शिल्पा आमच्यामध्ये प्रत्येक गोष्ट फार विचार करून बोलते. तिच्या डोक्यात कसल्याच विचारांचा गुंता नसतो. ती एक उत्तम लेखक आहे. शिल्पाला लेखिका म्हटलेलं आवडत नाही. त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी तिला लेखक म्हणतो. आता आम्हा मैत्रिणींच्या डोक्यात शिल्पाने या गोष्टी एवढ्या कोरल्या आहेत की, चुकूनही मी तिला लेखिका बोलणार नाही, तिचा उल्लेख करताना आम्ही लेखक असाच करतो.”

हेही वाचा : कुटुंबाचा उल्लेख अन् दुसऱ्या अभिनेत्रीशी तुलना केल्याने संतापली ‘मुन्नी’, हर्षाली मल्होत्रा ट्रोलरला म्हणाली, “तुम्हाला लाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि शिल्पा नवलकर यांनी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. सुकन्या मोने यांनी चित्रपटात साधना तर, शिल्पा नवलकर यांनी केतकी हे पात्र साकारले आहे. ‘बाईपण भारी देवा’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ७० कोटींहून अधिक कमाई केली असून चित्रपटातील मुख्य सहा अभिनेत्रींचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात येत आहे.