केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. सहा अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. ३० जून २०२३ रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांची ‘फोर्ब्स इंडिया मॅगझिन’ने दखल घेकली होती. अ‍ॅटली, करण जोहर, सिद्धार्थ आनंद, विधू विनोद चोप्रांसह केदार शिंदेंचं नाव झळकणं ही सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट होती. आता ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

‘बाईपण भारी देवा’च्या दिग्दर्शकाप्रमाणे या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक साई-पियूष यांच्या जोडीची सुद्धा राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. यंदाच्या ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये त्यांच्या कामाची नोंद करण्यात आली आहे. साई-पियूष ही जोडी मराठी मनोरंजन विश्वात गेली १५ वर्षापासून कार्यरत आहे. ‘मिशन पॉसिबल’, ‘रणभूमी’ ,’ती अँड ती’, ‘आरॉन’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘ ख्वाडा’, ‘लग्न मुबारक’, ‘बाईपण भारी देवा’, ‘चौक’ यांसारख्या सिनेमांना तसेच ‘दामोदर पंत’, ‘गेला उडत’, ‘ढॅण्टॅढॅण्ड’, ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’, ‘के दिल अभी भरा नाही’, ‘अस्तित्व’ या नाटकांना संगीत दिलं आहे.

forbes
‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये नोंद

हेही वाचा : ‘खुर्ची’ चित्रपटाच्या प्रदर्शनात आडकाठी; अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाला ‘असा’ मिळाला हिरवा कंदील

साई-पियूष याविषयी सांगतात, “२०२३ साली ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा आला आणि या सिनेमामुळे आम्हाला भरपूर यश अनुभवायला मिळालं. गेली पंधरा वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतोय, अनेक सिनेमे गाणी हिट झाली. ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ आमचं नाव येणं, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कष्ट, मेहनत आणि चांगलं काम झाल्यामुळे त्याची नोंद ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये झाली याचा आम्हाला अभिमान वाटतोय. ‘फोर्ब्स मॅगझिन इंडिया’ मध्ये आमचं नाव येईल असं आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. या यशासाठी आम्ही ‘बाईपण भारी देवा’चे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मनापासून आभार मानतो.”

sai piyush
संगीतकार साई-पियूष

हेही वाचा : थेट अक्षयाच्या घरी जाऊन हार्दिक जोशीने घातली होती लग्नाची मागणी अन्…; जोडप्याने पहिल्यांदाच सांगितली लव्हस्टोरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता येत्या काही काळात प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’, निखिल वैरागर दिग्दर्शित ‘आंबट शौकीन’ आणि अभ्यंघ कुवळेकर दिग्दर्शित ‘गुलाबी’ या आगामी मराठी सिनेमातील गाण्यांना साई-पियूष यांनी संगीत देणार आहेत.