भरत जाधव हा मनोरंजनसृष्टीतील बहुआयामी अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंत विविध नाटक-मालिका चित्रपटांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळवलं आहे. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. आता मनोरंजनसृष्टीबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

गेली अनेक वर्षं भरत मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. या प्रदीर्घ काळामध्ये त्याला अनेक दिग्गज कलाकारांचं मार्गदर्शन लाभलं. याचबरोबर त्याला जिवाभावाचे मित्रही भेटले. भरत जाधव, अंकुश चौधरी व केदार शिंदे यांच्यात असलेली मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. पण तसं जरी असलं तरी भरतला या क्षेत्रात मित्रमंडळी कमी आहेत. या सगळ्याबद्दल त्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने भाष्य केलं.

आणखी वाचा : “हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण

या मुलाखतीत श्रेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचा उल्लेख निघाल्यावर तो म्हणाला, “विजूमामा म्हणजे एक नंबरी माणूस! ते उत्तम अभिनेते होतेच, पण याचबरोबर ते माणूस म्हणूनही खूप चांगले होते. आम्ही त्यांना देवमाणूस म्हणायचो. करिअरच्या विविध टप्प्यांवर योग्य व्यक्तीने मार्गदर्शन केलं की, आपण तशी पावलं टाकतो आणि आपल्याला यश मिळतं. विजूमामांनी मला नेहमी योग्यच दिशा दाखवली.”

हेही वाचा : “बाळासाहेबांना नाटक कसं वाटलं?” प्रयोगानंतर भरत जाधवने केलेला राज ठाकरेंना फोन; समोरून असं काही उत्तर मिळालं की…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे तो म्हणाला, “मनोरंजनविश्वात बरंच गॉसिपिंग असतं. कधी कधी आपला काहीही संबंध नसताना आपल्याला त्यात गोवलं जातं. त्यामुळे त्यांच्याकडून मला आपण कशातच पडू नये ही महत्त्वाची शिकवण मिळाली. करिअरमध्ये आपण अशा गोष्टींमुळे भरकटलो तर आपल्याला काहीच साध्य करता येणार नाही याची जाणीवही मला त्यांच्यामुळे झाली. त्यामुळे माझा मित्रपरिवारही मोजकाच आहे.” आता त्याचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.