गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत हे कलाकार आपला व्यवसाय करत आहेत. अभिनेत्री अनघा अतुल, श्रेया बुगडे, अरबाज शेख, तेजस्विनी पंडीत, गौरी कुलकर्णी असे अनेक कलाकार अभिनयासह अन्य क्षेत्रांमध्येही नशीब आजमावतांना दिसत आहेत. या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाची भर पडली आहे. ही अभिनेत्री राजकारणातही सक्रिय असून तिने आता स्वतःचा व्यवसाय देखील सुरू केला आहे.

‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे हिने नव्या व्यवसायात पाऊल ठेवलं आहे. मेघाची खास मैत्रीण सई लोकूरने काही तासांपूर्वी एक इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये मेघाने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केल्याचा खुलासा केला.

हेही वाचा – Video: “गेले काही दिवस गोकुळधाममधल्या…”, साखरपुड्यात पूजा सावंत व सिद्धेश चव्हाणचं अनोख्या अंदाजात ‘या’ व्यक्तीने केलं स्वागत

रत्नागिरीतील गणेशगुळे येथील समुद्र किनारी मेघाने सुंदर व्हिला सुरू केला आहे. ‘व्हिला मँगोस अँड सीशेल्स ‘(Villa Mangoes And Seashells) असं या व्हिलाचं नाव आहे. मेघाने या सुंदर व्हिलाचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पितळेची भांडी, लाकडी उखळ, पलंग, टेबल, खुर्ची असं सर्व काही पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – दीड वर्षांनंतर सई लोकूर लेकीसह भेटली मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतला, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात मेघा धाडेने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.