‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. ‘धर्मवीर’मधून शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे.

आता लवकरच ‘धर्मवीर’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून, काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. या मुहूर्ताला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार तसेच राजकीय नेते उपस्थित होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केलं असून, निर्मिती मंगेश देसाईंनी केली आहे. नुकतीच या दोघांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

हेही वाचा : झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

प्रवीण तरडेंसह ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी महेश लिमये देखील उपस्थित होतील. सध्या यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “राज साहेब, महेश लिमये, प्रवीण तरडे आणि मी…मस्त गप्पा” असं कॅप्शन देत मंगेश देसाईंनी हा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा : नवीन हॉटेल व मालिका! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, धर्मवीर २ मध्ये प्रसाद ओकशिवाय कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या पोस्टरवर भगव्या रंगात’ धर्मवीर २’ आणि “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट….” अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. आता चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.