लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गेले अनेक महिने या चित्रपटाची टीम यावर काम करत आहे. हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणताही अपडेट समोर आला नाही. त्यामुळे आता नेटकऱ्यांनी याबाबत प्रश्न विचारायला सुरुवात केली. तर आता त्याला या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा : Video: विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल अजय पुरकर यांचा मोठा निर्णय, व्हिडीओवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित करून हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रदर्शित होणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. पण त्यानंतर या चित्रपटाच्या बाबतीतली कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या एका पोस्टवर कमेंट करत एका नेटकाऱ्याने लिहिलं, “दादा सुभेदार चित्रपट कधी येणार आहे? जूनमध्ये येणार होता ना? आपल्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघतोय.” त्यावर दिग्पाल लांजेकर यांनीही उत्तर दिलं. त्यांनी या कमेंटला रिप्लाय देत लिहिलं, “लवकरच घोषणा होईल.”

हेही वाचा : प्रसाद ओक लवकरच दिसणार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत? प्रसिद्ध दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख का पुढे ढकलण्यात आली याचं कारण अजून समोर आलं नाही. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.