अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांना एकत्र काम करताना बघणं म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मेजवानीच असते. नुकताच त्यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकाचे सगळे प्रयोग सध्या हाऊसफुल सुरू आहेत. नुकतंच हे नाटक दिग्दर्शक संजय जाधव यांनी पाहिलं आणि त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नवा गडी नवं राज्य’ या गाजलेल्या नाटकानंतर जवळपास १० वर्षांनी ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या माध्यमातून हे दोघेही पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र काम करताना दिसत आहेत. या नाटकासाठी त्यांच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील त्यांचे मित्र मंडळी देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. आता संजय जाधव यांनी या नाटकाचं कौतुक केलं.

आणखी वाचा : तंदुरुस्त आरोग्य अन् नितळ त्वचा; प्रिया बापटने उघड केलं रहस्य, म्हणाली…

संजय जाधव यांनी नुकताच पार्ल्याला या नाटकाचा प्रयोग पाहिला. तो प्रयोगही हाउसफुल होता. नाट्यगृहाबाहेर लावलेल्या हाउसफुलच्या पाटीजवळ संजय जाधव यांनी त्यांचा एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “हाउसफुल…प्राऊड फिलिंग… आपल्या भावाचं नाटक खूप छान कामगिरी करत आहे. आणखी काय हवं!”

हेही वाचा : “मी मालिकांपासून लांब राहिले कारण…”, प्रिया बापटचा खुलासा, म्हणाली, “या माध्यमात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या व्यतिरिक्त या नाटकात पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.