गौतमी पाटील हिने आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा प्रमाणात आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. अशी ही लोकप्रिय नृत्यांगना मराठी सिनेसृष्टीतही सक्रिय झाली आहे.

गौतमी पाटील आता चित्रपटात फक्त डान्स नाही तर अभिनय करतानाही दिसत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मूषक आख्यान’ चित्रपटात गौतमी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर झळकली. त्याआधी ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपटातील एका गाण्यात गौतमीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. या चित्रपटातील ‘लिंबू फिरवलं’ या गाण्यात गौतमी अमेय वाघबरोबर थिरकली. त्यानंतर आता गौतमी पाटील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरेबरोबर झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा – “आजवर या प्रवासात…”, विशाखा सुभेदारच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, “माझ्याकडून…”

काही तासांपूर्वी गौतमी पाटीलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौतमीबरोबर अलका कुबल, सई ताम्हणकर, शिव ठाकरे दिसत आहे. चौघं देखील एकमेकांशी गप्पा मारताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत गौतमीने लिहिलं आहे, “सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं.” गौतमीच्या याच व्हिडीओमुळे ती आता अलका कुबल, सई ताम्हणकर आणि शिव ठाकरे यांच्याबरोबर झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – फुलांची सुंदर सजावट, पंचपक्वान्न, आहेर अन्….; मराठी कलाकारांनी रेश्मा शिंदेचं ‘असं’ केलं केळवण, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा – “लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता…”, समीर परांजपेसाठी लोकप्रिय दिग्दर्शकाने लिहिलेली पोस्ट होतेय व्हायरल, वाचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौतमी पाटीलच्या या व्हिडीओवर शिव ठाकरेने “बाप्पा मोरया” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच तिच्या अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मला तुझा अभिमान वाटतो. तुझी अशीच प्रगती होऊ दे”, “तू वादानंतर स्वतःमध्ये बदल केलास त्यामुळे आज यश पाहतेस”, “खूप भारी”, अशा प्रतिक्रिया गौतमीच्या चाहत्यांच्या उमटल्या आहेत.