मराठी कलाविश्वातील अनेक कलाकरांनी बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी व रंगभूमीवर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सयाजी शिंदे, प्रवीण तरडे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, सई ताम्हणकर, महेश मांजरेकर, श्रिया पिळगावकर, गिरीजा ओक अशा बऱ्याच कलाकारांनी हिंदी मनोरंजनविश्वात त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. यापैकी गिरीजाला थेट बॉलीवूडच्या किंग खानबरोबर झळकण्याची संधी मिळाली होती. हिंदी कलाविश्व गाजवल्यावर आता लवकरच गिरीजा इंग्रजी नाटकात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

गिरीजा ओकला मराठीसह बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ असो किंवा शाहरुख खानचा ‘जवान’ नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. आता लवकरच ती रंगभूमीवर काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा : शाहरुख व गौरी खानने तीन पद्धतीने केलं होतं लग्न, प्रसिद्ध निर्मात्यांनी सांगितला किस्सा; म्हणाले, “त्यांच्या लग्नात…”

१९ व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या ‘गौहर’ या इंग्रजी नाटकात गिरीजा प्रमुख भूमिका साकारत आहे. यामध्ये तिने आठ गाणीही लाईव्ह गायली आहेत. शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये झळकल्यानंतर अभिनेत्रीने ‘व्हॅक्सिन वॅार’ या हिंदी चित्रपटात महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली होती. विविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची जादू तिने कायम दाखवली आहे. आगामी नाटकात देखील तिच्या अभिनयाची अनोखी बाजू बघायला मिळणार आहे. ती इंग्रजी नाटकात गौहर यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

लिलेट दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गौहर’ या नाटकात गिरीजासह नीना कुलकर्णी प्रमुख भूमिकेत आहेत. कोलकाता येथील प्रसिद्ध गायिका गौहर जान यांची कारकिर्द १९ व्या शतकाच्या सुरुवातीला बहरली होती. व्हॅक्स रेकॅार्डवर गाणी रेकॉर्ड होणाऱ्या गौहर आशियातील पहिल्या आर्टिस्ट आहेत. अशा या हरहुन्नरी गायिकेचा प्रवास नाट्यरुपात रसिकांसमोर येत आहे.

हेही वाचा : Video : सुंदर समुद्रकिनारा, पारंपरिक लूक अन्…; मुग्धा-प्रथमेशने शेअर केला खास व्हिडीओ, दोघांच्या साधेपणाचं होतंय कौतुक

View this post on Instagram

A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये या नाटकाचे दोन प्रयोग मुंबईत होणार असून यात गिरीजा वेगवेगळ्या भाषांमध्ये आठ गाणी गाणार आहे. बंगाली, कानडी, इंग्रजी आणि उरलेली हिंदीत आहे. ही गाणी गिरीजा लाईव्ह गाणार आहे. ‘गौहर’ या नाटकात गिरीजाच्या अभिनयाची जादू अनुभवण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.