मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई करत मराठीत एक नवा विक्रम रचला. या चित्रपटातील कलाकारांचंही नशिब बदललं. त्यातीलच दोन कलाकार म्हणजे रिंकू राजगुरु व आकाश ठोसर. त्यांनी या चित्रपटामध्ये साकारलेली आर्ची व परश्या ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. रिंकू आता विविध चित्रपट, वेबसीरिजमध्ये काम करताना दिसते. आज तिचा वाढदिवस आहे. याचनिमित्त तिच्याबाबत काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंकू व आकाश ही जोडी आजही सुपरहिट आहे. प्रेक्षकांनी या दोघांना एकत्रित पाहिलं की ‘सैराट’ चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. रिंकू व आकाश दोघंही सोशल मीडियाद्वारे एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करताना दिसतात. मध्यंतरी तर हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र या सगळ्या चर्चांवर आकाशने अगदी सडेतोड उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा – दोन विवाहित अभिनेत्यांबरोबर होतं श्रीदेवी यांचं अफेअर, दोघांच्याही पत्नींना कळलं अन्…

‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत आकाशला त्याच्या व रिंकूच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तो म्हणाला, “मी आणि रिंकू जेव्हा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करतो, तेव्हा मला खूप मज्जा वाटते. मला एकट्यालाच नाही तर रिंकूलाही या गोष्टी फार मजेशीर वाटतात. जेव्हा आमच्यापैकी कोणीही पोस्ट करतं तेव्हा आम्ही एकत्र असतो. आता फक्त मजा बघ, असे आम्ही एकमेकांना सांगत असतो. आर्ची आणि परश्याची जोडी लोकांना खूप आवडली. ते आजही त्या जोडीला तितकंच प्रेम देतात”.

आणखी वाचा – घरीच २५ लोकांमध्ये विवाह उरकला, लग्नानंतरही चार ते पाच वेळाच नवऱ्याला भेटली अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अजब खुलासा

पुढे तो म्हणाला, “पण हे लोकांचं प्रेम आहे, त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. आम्ही दोघेही एकमेकांना डेट करत आहोत या सगळ्या अफवा आहेत. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. यापलीकडे आमच्या दोघांत काहीच नाही”. असं म्हणत आकाशने रिंकू बरोबरच्या नात्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happu birthday rinku rajguru her dating rumour with actor akash thosar know fact see details kmd
Show comments