‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने घराघरांत लोकप्रिय झाला. त्याला या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती. हास्यजत्रा सोडल्यानंतर आजही ओंकारचं त्याच्या सहकलाकारांबरोबर जिव्हाळ्याचं नातं आहे. याची प्रचिती नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान आली.

हेही वाचा : भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकरने शेअर केली भावुक पोस्ट; म्हणाली, “तुला गमावण्याचं दुःख…”

ओंकार भोजनेने ‘हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला तरीही या कार्यक्रमातील सगळे विनोदवीर आजही त्याच्या संपर्कात असतात. ‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटात ओंकार भोजनेसह हास्यजत्रेतील कलाकार नम्रता संभेराव, वनिका खरात, रोहित माने यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच ही कलाकार मंडळी रुईया महाविद्यालयात गेली होती.

हेही वाचा : मालिकेसाठी कुटुंब अन् पत्नीपासून ९ महिने दूर होता मराठी अभिनेता; घरी पोहोचताच ‘असं’ झालं स्वागत, शेअर केला व्हिडीओ

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आग्रहास्तव ओंकार भोजनेने त्याची लोकप्रिय कविता याठिकाणी सादर केली. काही महिन्यांपूर्वी ओंकारची ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. ‘तू दूर का…’, असे या कवितेचे बोल आहेत. अभिनेता कविता सादर करत असताना प्रेक्षकांनी त्याला टाळ्या वाजवत साथ दिली. यावेळी मंचावर ओंकारसह नम्रता संभेराव आणि वनिता खरात या दोघीही उपस्थित होत्या.

हेही वाचा : “‘बॉईज ४’च्या ट्रेलरमध्ये तुझे सीन्स कट का केलेत?” चाहत्याच्या प्रश्नावर अभिनय बेर्डे म्हणाला, “त्यांनी असं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओंकारची कविता ऐकून प्रेक्षक भारावून गेले होते आणि नम्रता संभेराव मंचावरच भावुक झाली असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्याने कविता सादर केल्यावर नम्रताने त्याचं कौतुक करत त्याला मिठी मारली. ओंकार नम्रता संभेरावला प्रेमाने ताई म्हणतो. त्या दोघांची मैत्री यापूर्वीदेखील प्रेक्षकांनी पाहिली आहे. दरम्यान, ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, भाऊ कदम, ओंकार भोजने, वनिता खरात, रोहित माने या कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.