‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे, तर अभिनेता अंकुश चौधरी याने या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारताबाहेरही या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

या चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय, चित्रपटाचं दिग्दर्शन याबरोबरच या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजत आहेत. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर अनेक चाहते, कलाकारांनी रील्स बनवली. आता एका जपानी कलाकाराने या गाण्यावर ताल धरला आहे. त्यांचं हे नृत्य सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ला मिळणारा प्रतिसाद पाहून केदार शिंदेंनी प्रेक्षकांना दिली ‘ही’ खास भेट

काकेताकू असं या जपानी कलाकाराचं नाव आहे. त्याने ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील पोस्ट केलं. या गाण्यावर नृत्य करत असताना त्याला पिरो या त्याच्यासह कलाकाराने साथ दिली. विशेष म्हणजे हा व्हिडीओ त्यांनी जपानच्या रस्त्यावर शूट केला आहे. हा व्हिडीओ केदार शिंदे व सना शिंदे यांनी त्यांच्या स्टोरीवर पोस्ट करत त्यांचे नृत्य आवडल्याचं सांगितलं आहे. याचबरोबर नेटकरीदेखील या व्हिडीओवर कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : Video: शिल्पा शेट्टीला पडली ‘महाराष्ट्र शाहीर’ची भुरळ, व्हिडीओ पोस्ट करत लिहीलं…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कामगिरी करताना दिसत आहे. अंकुश चौधरीबरोबरच अभिनेत्री सना शिंदे व अश्विनी महांगडे यांनी या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.