मराठी मनोरंजन विश्वात सध्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा पहिला भाग लॉकडाऊननंतर २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर सगळ्याच चाहत्यांच्या मनात ‘झिम्मा २’ केव्हा येणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सात बायकांचं रियुनियन ‘झिम्मा २’च्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ चांदेकरने कलाकृती मीडियाशी संवाद साधला.

सिद्धार्थ चांदेकरला मुलाखतीत सेटवरची सगळ्यात सुंदर आणि लक्षात कायम लक्षात राहणारी आठवण कोणती? याबाबत विचारण्यात आलं. यावर अभिनेता म्हणाला, म्हणाला, “सायली आणि रिंकूने माझ्या वाढदिवसाला खास माझ्यासाठी भाकऱ्या बनवल्या होत्या. याचबरोबर सुहास मावशीने तिथे (परदेशात)थालीपीठं केली होती.”

हेही वाचा : “BCCI चा त्रिवार निषेध”, कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याने मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला…

“आमच्या चित्रपटातील सगळ्या बायकांनी मिळून माझ्यासाठी खास ताट वाढून आणलं होतं. त्यादिवशी माझा वाढदिवस होता म्हणून तो प्रसंग…तो क्षण माझ्या कायम लक्षात राहील” असं सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं. तो या ‘झिम्मा २’ चित्रपटात कबीर ही भूमिका साकारत आहे.

हेही वाचा : “आज शेजारी टीव्ही फुटत आहेत,” भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी अभिनेत्रीने शेअर केला फोटो; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बहुचर्चित ‘झिम्मा २’ मध्ये सिद्धार्थ चांदेकरसह सायली संजीव, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, शिवानी सुर्वे, क्षिती जोग, रिंकू राजगुरू या अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू ‘झिम्मा’च्या पहिल्या भागात नव्हत्या. त्यामुळे ‘झिम्मा २’च्या निमित्ताने त्यांनी साकारलेल्या तानिया आणि मनाली या पात्रांची प्रेक्षकांना नव्याने ओळख होणार आहे. येत्या २४ नोव्हेंबरला ‘झिम्मा २’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.