मराठी मनोरंजन विश्वात सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित हा सिनेमा सात बायकांच्या आयुष्यावर आधारित असून आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये झिम्माचा पहिला भाग लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी झिम्माचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर चित्रपटात एका परदेशी अभिनेत्याने आपलं लक्ष वेधून घेतलं… हा अभिनेता नेमका कोण आहे? याबाबत दिग्दर्शक हेमंत ढोमेने नुकतीच एक पोस्ट शेअर करून खुलासा केला आहे.

‘झिम्मा २’च्या ट्रेलरमध्ये जॅक मॅकगिन या अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. यापूर्वी त्याने हेमंत ढोमे दिग्दर्शित सनी चित्रपटात देखील काम केलं होतं. तो उत्तम अभिनेता आणि संगीतकार म्हणून ओळखला जातो. याची ओळख करून देण्यासाठी हेमंत आणि क्षितीने खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “बाबा गेल्यावर तिला जोडीदार…”, आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सिद्धार्थ चांदेकरने मांडलं मत; म्हणाला, “तो अनुभव…”

हेमंत या लिहितो, “‘झिम्मा २’ या आपल्या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणारा आमचा मित्र जॅक मॅकगिन हा खास सातासमुद्रापार इकडे आलाय, आपल्या सिनेमासाठी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी…चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका तुम्हाला नक्की आवडेल. त्याला आपली भाषा बऱ्यापैकी शिकवली आहे…तो अतिशय प्रेमाने म्हणतो.. “म्हला मॅजा ॲली” पण, मित्रा तू आल्यामुळे खरच खूप मजा आली!”

हेही वाचा : “गावाकडची बाई दारु प्यायली तर…”, ‘झिम्मा २’मधील ‘त्या’ सीनबद्दल निर्मिती सावंत यांचा खुलासा; म्हणाल्या, “मी फक्त…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘झिम्मा २’मध्ये सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू या अभिनेत्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.