केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. दोन दिवसांपूर्वी या चित्रपटानं १२ कोटींचा गल्ला जमवला होता. अजूनही ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मीडियावर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कलाकारांविषयी खास पोस्ट शेअर करीत आहेत. पडद्यामागच्या कलाकारांची ओळख करून त्यांच्याविषयी लिहित आहेत. नुकतीच त्यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांची वेशभूषाकार युगेशा ओमकार हिच्याविषयी खास पोस्ट लिहित एक खंतही व्यक्त केली आहे.

केदार शिंदेंनी लिहिले आहे की, काम करण्याचं काही वय नसतं. युगेशा ओमकार वयानं लहान आहे; पण ज्या जबाबदारीनं तिनं ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ या माझ्या दोन्ही चित्रपटांसाठी वेशभूषा सांभाळली त्याला तोड नाही. तिच्या अभ्यासू वृत्तीनं तिनं हे अतिकठीण काम सोपं केलं. तिचं प्रत्येक गोष्टीतलं पेपर वर्क हे पाहण्यासारखं असतं. कॅरेक्टर लेखक लिहितो; पण ते उभं करताना वेशभूषेतल्या बारीकसारीक डिटेल्स युगा शोधून काढते. त्यामुळे ते कॅरेक्टर जिवंत होतं. युगा माझी वहिनी आहे; पण त्यापेक्षा ती माझ्या मुलीसारखीच आहे. पण जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा ती मला ‘सर’ म्हणते.

हेही वाचा – “वडिलांचं नाव धुळीत…” असं म्हणत महिलेनं अभिषेक बच्चनच्या लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं?

“ओमकार मंगेश दत्त हा नवरा म्हणून बरोबर असतो; पण त्याहीपेक्षा तो तिच्या गाईड म्हणून खंबीरपणे पाठीशी उभा राहतो. एकमेकांना उत्तम कॉम्प्लिमेंट करीत ते हे क्रिएटिव्ह काम करीत असतात. या दोन्ही चित्रपटांच्या पारितोषिकासाठी उद्या तिची निवड झाली नाही, तर मला नवलच वाटेल. पण, युगा पारितोषिक नाहीच मिळालं तरी हरकत नाही. १६ सिनेमे करूनही मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक? प्रेक्षकांसाठी आपण अव्याहतपणे काम करायचं,” असं म्हणत केदार शिंदे यांनी पारितोषिक न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

हेही वाचा – ‘आदिपुरुष’मधील कुंभकर्ण दररोज २० पोळ्या, २५ अंडी व १ किलो खायचा चिकन, कोण आहे ‘हा’ अभिनेता जाणून घ्या

हेही वाचा – इंडस्ट्रीमध्ये कोणत्या अभिनेत्याच्या घरचं जेवण सर्वात जास्त आवडतं?, महेश मांजरेकर म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदेंनी आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘मुकाम पोस्ट लंडन’, ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘महाराष्ट्र शाहीर’ अशा दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमातून केदार यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवर आणि मालिकाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली.