माधुरी दीक्षितचे जगभरात लाखो चाहते आहेत. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये ती चाहत्यांना अगदी सहज ‘मोहिनी’ घालते. माधुरीला बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून देखील ओळखलं जातं. आज गुढीपाडव्याच्या सणानिमित्त अभिनेत्रीने खास मराठमोळा साज केला आहे. आपल्या लाखो चाहत्यांना माधुरीने खास मराठमोळ्या अंदाजात गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

माधुरीने या व्हिडीओमध्ये म्हणते, “चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!”

हेही वाचा : ऐश्वर्या नारकरांनी दिला आठवणींना उजाळा, शेअर केला लेकाबरोबरचा जुना फोटो; म्हणाल्या, “संतूर आई…”

हिरवी पैठणी साडी, गळ्यात नाजूक हार, नाकात नथ, हातात पाटल्या या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत आहे. सणानिमित्त मराठमोळा लूक करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्याने सध्या अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Video: आमदार धिरज देशमुखांच्या सासूबाईंना पाहिलंत का? रकुल व जॅकीबरोबरचा व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. नुकताच तिची व डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.