नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून मंगेश देसाई यांना ओळखलं जातं. नुकतंच त्यांनी मुंबईत स्वत:चं आलिशान घर खरेदी केलं. गणेश जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. अभिनेत्याच्या घरी अतिशय थाटामाटात गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. याची खास झलक त्यांनी इन्स्टाग्राम व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत स्वत:चं हक्काचं घर खरेदी केलं आहे. अश्विनी महांगडे, पृथ्वीक प्रताप, अक्षय केळकर, गिरीजा प्रभू, ऋतुजा बागवे, प्रसाद ओक यांच्या पाठोपाठ आता अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी देखील त्यांच्या नव्या घराची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली. त्यांच्या नव्या घराच्या दारावर ‘मंगेश शलाका साहील देसाई’ अशी सुंदर नेमप्लेट लावण्यात आली आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर विवेक अग्निहोत्रींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑस्कर, राष्ट्रीय पुरस्कार…”

गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मंगेश देसाईंनी नव्या घरात खास पूजेचं आयोजन केलं होतं. यावेळी मराठी कलाविश्वातील कलाकारांसह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांच्या सूनबाई वृषाली शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील नव्या घरात मंगेश देसाई यांची भेट घेऊन अभिनेत्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : “त्यांना लहान केस आवडायचे नाहीत”, अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता नंदाने केला खुलासा; म्हणाली, “माझे वडील नाराज…”

“घर, म्हणजे नुसतं विटांचं काम नसतं….घर, पहाटेचं सुंदर स्वप्नं असतं… घर, नात्यांचं रेशीम बंध असतं… घर, त्यात वास्तव्य करण्याचं अस्तित्व असतं आणि जेव्हा गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छांनी ते भरतं तेव्हा त्याला कोणाची दृष्ट लागू शकत नाही.” असं कॅप्शन मंगेश देसाई यांनी त्यांच्या नव्या घरातून शेअर केलेल्या पहिल्या व्हिडीओला दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठी कलाविश्वातून शर्मिष्ठा राऊत, ऐश्वर्या व अविनाश नारकर, प्रवीण तरडे, महेश लिमये अशा अनेकांनी मंगेश देसाईंच्या नव्या घरातील गृहप्रवेश पूजेला उपस्थिती लावली होती. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘धर्मवीर २’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा निर्मितीची धुरा सांभाळत आहेत.