‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून अभिनेत्री मानसी नाईकने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. कामामुळे सतत चर्चेत असणारी मानसी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे सध्या अडचणीत आली आहे. नवऱ्यापासून विभक्त होत असल्याचं मानसीने उघडपणे सांगितलं. पण तिच्या पतीने मात्र याबाबत अजूनही बोलणं टाळलं आहे.

आणखी वाचा – Video : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान मानसी नाईकचा नवरा पबमध्ये पार्टी करण्यात मग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

मानसीचा पती प्रदीप खरेराने नुकताच पबमध्ये पार्टी करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तो एका हिंदी गाण्यावरही थिरकताना दिसला. “तुमको प्यार करते है” असं त्याने व्हिडीओ शेअर करत म्हटलं होतं.

या व्हिडीओनंतर प्रदीपने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बीचवर फिरताना दिसत आहे. शर्ट काढत तो बीचवर धावत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

आणखी वाचा – रिलेशनशिप, लग्न अन् आता घटस्फोट…; मानसी नाईकच्या बॉक्सर नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीपने हा व्हिडीओ शेअर करत “Trending Now” असं म्हटलं आहे. मानसीने घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. पण प्रदीपने अद्यापही याबाबत काहीच न बोलणं पसंत केलं आहे. तो सध्या सोशल मीडियाद्वारे त्याचे विविध व्हिडीओ व फोटो शेअर करताना दिसत आहे.