मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे संजय जाधव. त्यांनी आतापर्यंत मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक उत्तम चित्रपट दिले. ‘दुनियादारी’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘गुरु’, ‘जोगवा’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते. संजय जाधव यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने अभिनेता कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. कुशल बद्रिकेने संजय जाधव यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. कुशल बद्रिके हा लवकरच संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”
कुशल बद्रिकेची पोस्ट
“तशी आपली ओळख फार जुनी म्हणजे “साडे माडे तीन” पासूनची पण मैत्री कधीपासूनची? हे काही मला नीटसं सांगता येणार नाही.
“गंगुबाई नॉन मॅट्रिक” फिल्मच्या सेटवर फ्रेम रिकामी दिसते ! म्हणून मला वापरलंस तिथली, का मग “रावरंभाच्या” हॉटेल मधली पहाटेच्या 5:30 ची ब्लॅककॉफी वाली मैत्री आपली, का मग “हवा येऊ द्या” च्या सेटवर मी संजू दादा बनून येतो आणि तुझ्यासारखा “सारे विश्वची माझे घर” असल्यासारखा वावरतो तेव्हाची, का मग आत्ता आत्ता लंडनच्या बस मध्ये तुझ्या Spartas सोबत झालेल्या प्रवासातली मैत्री.
दादा तुला ना माणसांना आपलंसं करून घ्यायचं व्यसन आहे. एवढी “दुनियादारी” बघितलेला माणूस तू ,आयुष्याने “चेकमेट” केलं तरी “फक्त लढ म्हणणारा” असा “गुरु” तूच. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तुझी एक “प्यार वाली लव स्टोरी” आहे आणि प्रत्येकाच्या यशात तुझा “खारी बिस्किटाचा” तरी वाटा आहेच.
आज तुझ्या वाढदिवशी तुझ्या “कलावतीला” लोकांच्या मनापर्यंत जायला “डोंबिवली फास्ट” ट्रेन मिळू दे, आणि box office वर “धुडघूस”घालूदेत हाच देवाकडे “जोगवा” मागतो. Happy birthday दादा खूप खूप शुभेच्छा आणि तुला मनापासून प्रेम. तुझ्यासारख्या माणसांना वय नसतं हेच खरं……”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.
दरम्यान संजय जाधव त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी तू ही रे, दुनियादारी, खारी बिस्किट यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाचं लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. या प्रार्थना बेहरे, कुशल बद्रिके, अभिनय बेर्डे हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका सकरताना दिसणार आहेत.