‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्वाधिक लोकप्रिय ठरला. बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने नवे विक्रम केले. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. त्यानिमित्ताने अभिनेता प्रसाद ओक याने खास पोस्ट शेअर केली आहे.

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी जेजुरीमधील खंडोबाचं दर्शन घेत धर्मवीरच्या दुसर्‍या भागाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. यावेळी ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ २ या चित्रपटाचे पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईन या पोस्टरवर पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडणार…”, प्रवीण तरडेंकडून ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

यानिमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने इन्स्टाग्रामवर या ‘धर्मवीर’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे पोस्टर शेअर केले आहे. याबरोबर त्याने त्याला हटके कॅप्शनही दिले आहे. “सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा, आता प्रत्यक्षात उतरणार… “धर्मवीर २” मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…'”, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोला दिले आहे.

आणखी वाचा : Video : रोमँटिक प्रपोज, किस अन्…; अंकिता लोखंडे दुसऱ्यांदा अडकली विवाहबंधनात, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला सोहळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’मध्ये प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. ‘धर्मवीर २’ या चित्रपटातही प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.