अभिनेते शरद पोंक्षे गेली अनेक वर्ष मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. मात्र त्यांची ओळख निर्माण झाली ती ‘नथुराम गोडसे’ या भूमिकेमुळे, या वादग्रस्त नाटकांचे हजारो प्रयोग झाले आहेत. यामध्ये त्यांना अनेक वेळा धमक्यादेखील मिळाल्या आहेत. असे असूनही त्यांनी या नाटकाचे प्रयोग गेली अनेक वर्ष केले आहेत. आता ते नाटक बंद झाले आहे. या नाटकातील अनुभव त्यांनी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकात लिहले आहेत.

मी नथुरामनंतर आता त्यांचे नवे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. बेधडक माझा आतला आवाज असे या पुस्तकाचे नाव आहे. शरद पोंक्षे यांनी स्वतः आपल्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये ते म्हणाले आहेत, ‘आज मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ह्यांच्या हस्ते माझ्या “मी आणि नथुराम” ह्या पुस्तकाच्या ११ व्या आवृ्ततीचं व ‘दूसरं वादळ’ ह्या पुस्तकाच्या ३ ऱ्या आवृत्तीचं लोकार्पण झालं. तसच नवीन येऊ घातलेल्या, ‘बेधडक’ ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं अनावरण झालं. हे ‘बेधडक माझा आतला आवाज’ पुस्तक पुढच्या गुढी पाडव्याला प्रकाशित होईल. सलग तीन गुढी पाडव्याना तीन पुस्तकं प्रकाशित होतील. रसिक वाचकांनी उदंड प्रतिसाद दिल्या बद्दल मी अत्यंत ऋणी आहे. हे प्रेम पुढच्या पुस्तकावरही कराल अशी आशा बाळगतो. धन्यवाद. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा’. अशी त्यांची पोस्ट आहे.

क्रांती रेडकरच्या घरी ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिली भेट, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान शरद पोंक्षेंना २०१८च्या डिसेंबरमध्ये कर्करोगाचं निदान झालं होत त्यांनी या रोगावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्या काळातील आलेले अनुभव त्यांनी एका पुस्तकात लिहले आहेत. ‘दुसरं वादळ’ असं या पुस्तकाचं नाव आहे. याच पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ चित्रपटात शरद पोंक्षे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहेत. शरद पोंक्षे यांचा नवा लूक या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. शिवाय ऐतिहासिक चित्रपटामध्ये त्यांची भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.