आजकाल कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या आगामी कामाबद्दल सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देत असतात. तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी शेअर करत असतात. इतकंच नव्हे तर आजूबाजूला सुरू असलेल्या घडामोडींवर परखड मतं मांडतात. अशातच सध्या दोन लोकप्रिय अभिनेत्यांचा एक फोटो खूप व्हायरल झाला आहे. हे दोन अभिनेते कोण आहेत? जाणून घ्या…

या फोटोमधील दोन कलाकार मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते आहेत. या दोघांनी एकत्र अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात केली होती. पुढे बसलेला अभिनेता अमेय वाघ असून त्याच्या मागे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आहे. सिद्धार्थने हा जुना फोटो शेअर केला आहे; जो सध्या खूप व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “बापरे शब्दात मांडू शकणार नाही असा हा विषय…”, सिद्धार्थ जाधवच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, म्हणाला…

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने हा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “२० वर्षांपूर्वी आम्ही एकत्र आमच्या करिअरची सुरुवात केली. ‘कवडसे’ हा आमचा दोघांचाही पहिला सिनेमा. त्यात आम्ही एकमेकांना सांभाळून घेणारे भाऊ होतो. आता परत. २० वर्षांनी, तेच भाऊ, तेच प्रेम, एक इरसाल नवी स्टोरी. ‘फसक्लास दाभाडे’…२४ जानेवारी २०२५ला.”

हेही वाचा – Video: वरुण धवनच्या सहा महिन्यांच्या लेकीला पाहिलंत का? मुंबई विमानतळावरील ‘त्या’ व्हिडीओत दिसली लाराची पहिली झलक

सिद्धार्थ चांदेकरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांसह चाहत्यांनी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेय वाघ प्रतिक्रिया देत म्हणाला, “२० वर्षे लोटली…जग बदललं…पण आपण अजूनही तेवढेच निरागस आहोत.” तर अभिनेत्री क्षिती जोग म्हणाली की, किती गोड होतात रे लहानपणी…आता का असे वागता मग? तसंच हरीश दुधाडे म्हणाला, “अरे यार किती भारी आहे हा फोटो. लव्ह यू सिद्धार्थ, अमेय…क्या बात है.”

हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांचा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’ हेमंत ढोमेने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ, अमेयसह क्षिती जोग, हरीश दुधाडे, राजसी भावे आणि निवेदिता सराफ पाहायला मिळणार आहेत. २४ जानेवारीला ‘फसक्लास दाभाडे’ प्रदर्शित होणार आहे.