अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या ती ‘गणराज गजानन’ या नवीन गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. अमृताचं हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे; प्रेक्षकांचा या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांनी हे गाणं गायलं आहे. ‘गणराज गजानन’ या गाण्याच्या प्रमोशननिमित्ताने अमृता सध्या टेलीव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच एंटरटेन्मेंट मीडियाशी देखील या गाण्याच्यानिमित्ताने ती संवाद साधत आहे. नुकतंच अमृता स्वामी समर्थांच्या प्रचिती विषयी बोलली.

हेही वाचा – “पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला अन्…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला विमानातला अनुभव, म्हणाला…

हेही वाचा – अभिनेता शशांक केतकरची गणरायाकडे ‘ही’ मागणी; म्हणाला, “माझ्या मुलासाठी…”

‘गणराज गजानन’ या गाण्यानिमित्ताने ‘मिरची मराठी’ या रेडिओ चॅनेलला अमृता खानविलकरने मुलाखत दिली. यावेळी तिला विचारलं गेलं की, ‘तुझ्या आयुष्यात स्वामींचं किती महत्त्व आहे?’ यावर अमृता म्हणाली की, “मला असं वाटतं ज्यांना आयुष्यात खूप चमत्कार बघायचे असतात ना. तर ते स्वामी चरणी जातात आणि स्वामी बोलवून घेतात. तुम्ही फक्त त्यांचा जप करा. त्याचं असं काहीच नसतं की, खूप मोठी पूजा वगैरे घाला. तुम्ही जितकं स्वामीचं मनाने करालं, तितकं आहे. माझ्या पडत्या आणि माझ्या अवघड काळात स्वामींनी मला बोलवून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही.”

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अमृता म्हणाली की, “मी जिकडे राहत होती, अगदी तिकडेच काही अंतरावर स्वामी समर्थांचं मठ होतं. मी अनेकवर्ष दररोज मठात गेलीये. त्यांची जी शक्ती आहे, ती विलक्षण आहे. ती फक्त तुम्ही अनुभवू शकता. ती सांगू शकत नाही. माझ्याबरोबर काय झालं? मला त्यांनी कुठल्या गोष्टींमधून बाहेर काढलंय?, असं सांगता येत नाही. स्वामींची शक्ती फक्त जाणवू शकते.”