scorecardresearch

Premium

अभिनेता शशांक केतकरची गणरायाकडे ‘ही’ मागणी; म्हणाला, “माझ्या मुलासाठी…”

‘मुरांबा’ फेम अभिनेता शशांक केतकरनं गणपती बाप्पाकडे काय मागणी केली?

Marathi Actor Shashank Ketkar
'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकरनं गणपती बाप्पाकडे काय मागणी केली?

‘होणार सून मी ह्या घरची’ हा मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘मुरांबा’ या लोकप्रिय मालिकेतून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकनं आपल्या उत्तम अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी शशांक एक आहे. आता त्यानं मराठीबरोबर हिंदीतही छाप उमटवली आहे. अलीकडेच तो हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम २००३’ (Scam 2003) या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. शिवाय लवकरच तो करण जोहरच्या वेब सीरिजमध्येही पाहायला मिळणार आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने यंदा बाप्पाकडे एक मागणी केली आहे.

हेही वाचा – “चार दिवसांपूर्वी आमच्याकडे खूप वाईट गोष्ट घडली…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने सांगितला प्रसंग; म्हणाली…

adah-sharma
‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण
priyanka-chahar-choudhary
“माझ्या कमी वजनावरून…” बिग बॉस १६ फेम अभिनेत्रीने सांगितला बॉडी शेमिंगचा धक्कादायक अनुभव; म्हणाली, “प्रत्येकाला…”
marathi actress Nandita Patkar
‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्री नंदिता पाटकरनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “एक सिक्रेट…”
Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

‘तारांगण’ या एंटरटेन्मेंट मीडियाशी संवाद साधताना शशांकनं लाडक्या बाप्पाकडे एक मागणी केली आहे. तो म्हणाला की, “मी गणरायाकडे वेळ मागेन. कारण मला आता ऋग्वेदला वेळ देता येत नाहीये. मला यामुळे कसंतरी होतं असतं. जेव्हा सकाळी निघतो तेव्हा तो झोपलेला असतो आणि जेव्हा घरी परतो तेव्हा देखील तो झोपलेला असतो. जे आपण अनेक गोष्टी आणि गाण्यांमध्ये ऐकतो, तसं माझ्याबरोबर होतंय. त्यामुळे मी बाप्पाकडे वेळ मागेन जो मला माझ्या मुलासाठी द्यायचा आहे. तसेच सगळ्यांसाठी स्वास्थ, सगळीकडे स्वच्छता, शांतता नांदू दे अशी बाप्पाकडे प्रार्थना करेन.”

हेही वाचा – Bigg Boss 17: टेलीव्हिजनवरील ‘हा’ लोकप्रिय चेहरा बिग बॉसच्या १७व्या पर्वासाठी निश्चित; कधीपासून सुरू होणार जाणून घ्या

दरम्यान, शशांकनं मालिका व्यतिरिक्त मराठी नाटक, चित्रपटात काम केलं आहे. ‘वन वे तिकीट’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘३१ दिवस’, ‘आरॉन’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘कुसुम मनोहर लेले’ यांसारख्या नाटकात सुद्धा त्यानं काम केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor shashank ketkar request ganpati bappa to give some time for him son pps

First published on: 21-09-2023 at 10:19 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×