‘फुलपाखरु’ या मालिकेमुळे अभिनेत्री ऋता दुर्गुळे नावारुपाला आली. त्यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय तिचे एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झाले. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला. काही दिवसांपूर्वीच ऋता तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात गेली होती. कामाबरोबरच ऋता तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे.

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत कलाविश्वात अनेक चर्चा रंगताना दिसतात. या मंडळींचे वैयक्तिक आयुष्यामधील फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी किस करत फोटो क्लिक करणं आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करणं काही कलाकारांना आवडतं. पण ऋताने कधी सार्वजनिक ठिकाणी किस केलं आहे का? याचं तिने स्वतःचं उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “१५०० रुपये मानधन सांगून ७०० रुपये दिले अन्…” संकर्षण कऱ्हाडेने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव, म्हणाला, “मी ते पैसे त्यांच्या…”

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऋताला “तू कधी सार्वजनिक ठिकाणी किस केलं आहे का?” असं विचारण्यात आलं. यावेळी तिने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. यावेळी ऋताने हो असं उत्तर दिलं. “चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तसेच खऱ्या आयुष्यातही तू सार्वजनिक ठिकाणी किस केलं का?” असंही ऋताला विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा – वडिलांचं निधन, शिक्षण करत नोकरी, कमी वयातच घराची जबाबदारी अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता म्हणतो, “बहिणींनी मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऋताने चित्रीकरणासाठी तसेच खऱ्या आयुष्यातही सार्वजनिक ठिकाणी किस केलं आहे. ऋताने अगदी दिलखुलासपणे या प्रश्नाचं उत्तर दिलं. ऋता सध्या तिचं सुखी वैवाहिक आयुष्य एण्जॉय करत आहे. ऋताने १८ मे २०२२ रोजी प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली. आता काम सांभाळत संसार करणं तिला उत्तम जमत आहे.