मराठी सिनेसृष्टीत अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या उत्तमरित्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळतात. अभिनयाबरोबर लेखन, व्यवसाय यामध्ये देखील त्या पारंगत आहेत. अशी एक अभिनेत्री म्हणजे मधुगंधा कुलकर्णी. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य या सर्व माध्यमांमध्ये लेखक आणि अभिनेत्री म्हणून लीला वावरणाऱ्या कलाकार म्हणून मधुगंधा यांना ओळखले जाते. त्यांनी लिहिलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा देखील त्यांनीच सांभाळली होती. अशा या हरहुन्नरी मधुगंधा यांनी अभिनेत्री, निर्माती शर्मिष्ठा राऊतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ

मधुगंधा कुलकर्णींनी शेअर केलेल्या या व्हिडीओत शर्मिष्ठा राऊत काही शब्दांचे मजेशीर उच्चार करताना दिसत आहे. या व्हिडीओत शर्मिष्ठाचा नवरा तेजस देसाई आणि स्वप्नील जोशी पाहायला मिळत आहेत. ते दोघं शर्मिष्ठाला काही शब्द बोलायला सांगत आहेत, पण ती त्या शब्दांचा मजेशीर उच्चार करताना दिसत आहेत. शर्मिष्ठाचे हे शब्द ऐकून स्वप्नील जोशी थक्क झालेला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: इस्रायलमध्ये अडकलेली नुसरत भरुचा सुखरुप परतली मायदेशी; व्हिडीओ आला समोर

शर्मिष्ठाचा हा व्हिडीओ शेअर करत मधुगंधा कुलकर्णींनी लिहीलं आहे की, निर्माती असून कधी कधी बोलता येत नाही. प्रॉब्लेम जरा समजून घ्या, फ्लोरोसंट आणि बाळंतीण अवघड आहे हो…आणि ब्लूटूथ?….नको नको….. हे शब्द भाषेमधून काढून टाका.

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

View this post on Instagram

A post shared by Madhugandha Kulkarni (@madhugandhakulkarni)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मधुगंधा कुलकर्णी यांच्या कामाबद्दल बोलायचं, नुकताच त्यांच्या निर्मिती खाली तयार झालेला ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचं लेखन पती परेश मोकाशी यांनी केलं आहे. सध्या ‘आत्मपॅम्फ्लेट’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.