Premium

“शाळेत असताना माझ्याकडे कोणीही बघायचं नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “त्या मित्राने मला प्रपोज केलं अन्…”

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला पहिल्या प्रपोजचा किस्सा

sanskruti-balgude
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला पहिल्या प्रपोजचा किस्सा. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

संस्कृती बालगुडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. फ्रेंडशिप अनलिमिटेड, भय, सर्व लाइन व्यस्त आहेत अशा अनेक मराठी चित्रपटांतून संस्कृतीने अभिनयाचा ठसा उमटवला. आता संस्कृती चौक सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या संस्कृती व्यग्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संस्कृतीने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. “कधी कोणाला प्रपोज केलं आहेस का?” असा प्रश्न संस्कृतीला विचारला गेला. यावर उत्तर देत “मी आयुष्यात कधीच कोणाला प्रपोज केलं नाही,” असं संस्कृती म्हणाली. यानंतर तिला “तुला पहिलं प्रपोज आठवतंय का?” हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना संस्कृतीने पहिल्या प्रपोजचा किस्सा सांगितला.

हेही वाचा>> “माझा बॉडीगार्ड मुस्लीम आहे”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली, “त्यांच्या धर्मातील लोक…”

“शाळेतला एक मुलगा होता. जो शाळेत असताना माझ्याशी कधी एक शब्दही बोलला नाही. पण शाळेनंतर आम्ही मित्र झालो. दहावीनंतर मी कॉलेजमध्ये असताना त्याने मला प्रपोज केलं होतं. माझ्याबद्दल फिलिंग्स आहेत, असं तो मला म्हणाला. माझ्यासाठी हे शॉकिंग होतं. कारण, शाळेत असताना माझ्याकडे कोणीही बघायचं नाही. कोणीही मला भाव द्यायचं नाही. त्यामुळे शाळेतल्या मित्राने मला प्रपोज केलं हे माझ्यासाठी शॉकिंग होतं,” असं संस्कृतीने सांगितलं.

हेही वाचा>> फुटबॉलचा केक, पार्टी अन्…; सलमान खानच्या बहिणीने केलं रितेश देशमुखच्या लेकाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन, अभिनेता म्हणाला…

संस्कृती बालगुडे चौक या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट ९ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संस्कृतीबरोबर प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी, किरण गायकवाड हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 10:43 IST
Next Story
“मेडल्स देशाची, मग जिंकणारे खेळाडू…” सोशल मीडियावर अपशब्द वापरत आस्ताद काळेची संतप्त पोस्ट