आपल्या डान्सच्या कौशल्याने सर्वांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणून दीपाली सय्यद यांना ओळखले जाते. दीपाली सय्यद या राजकीय क्षेत्रात सध्या चांगल्याच सक्रीय आहेत. काही दिवसांपूर्वी दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. सध्या दीपाली सय्यद या पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.

दीपाली सय्यद यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातील एका व्हिडीओत त्या लोणावळ्यात पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी दीपाली या त्यांच्या मैत्रिणींबरोबर छान डान्स करतानाही दिसत आहेत. यावेळी त्यांच्या आजूबाजूला धुकं, रस्ता आणि निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “देवेंद्र फडणवीसांना डोकेदुखीची गोळी तर मोदींना…”, अमोल कोल्हेंचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले “२ कोटी…”

यावेळी दीपाली यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्या मक्याचे कणीस भाजताना दिसत आहे. यावेळी भर पावसात एका छोट्याशा दुकानात त्या मका भाजतानाचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी त्या दहा रुपयाला एक असंही बोलताना दिसत आहे. तसेच त्या त्यांच्या मैत्रिणीला मका खाण्यासाठी हवा का? हे देखील विचारत आहेत.

या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. “प्रेम, प्रेम अन् फक्त प्रेम. प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या”, असे कॅप्शन दीपाली सय्यद यांनी या व्हिडीओला दिले आहे. तर एका व्हिडीओला त्यांनी “मी, पाऊस आणि मित्र” असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

View this post on Instagram

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दीपाली सय्यद यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर अनेकांनी ‘फारच मस्त’, ‘सुंदर’ अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी ‘तुम्ही फारच छान दिसताय’, असेही म्हटले आहे.