Marathi Actress Share Dance Video : मराठी संगीत विश्वात सध्या एका गायकाच्या नावाची चांगलीच चर्चा सुरू आहे, तो म्हणजे गायक संजू राठोड. संजू राठोडच्या ‘शेकी’ या लोकप्रिय गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावरील रील्स आणि शॉर्ट्सवर हे गाणं गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. जिथे पाहावं तिथे याच गाण्याची धून ऐकायला मिळत आहे.

हिंदी ‘बिग बॉस’ फेम ईशा मालवीयने या गाण्यात केलेल्या डान्सने गाण्याची लोकप्रियता आणखीनच वाढवली आहे. या गाण्यातील तिची हुकस्टेप आणि याच हुकस्टेप्सवरील रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे संजू राठोडचं ‘शेकी’ हे गाणं इतकं व्हायरल होण्यामागे ईशा मालवीयचीही तितकीच मेहनत आहे.

मराठी मनोरंजन विश्वासह अनेक बॉलीवूड कलाकार संजूच्या ‘शेकी’ गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. अशातच एका ज्येष्ठ मराठी अभिनेत्रीलादेखील या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आलेला नाही. या अभिनेत्री म्हणजे शुभांगी लाटकर. शुभांगी लाटकर यांनी आजवर आपल्या अभिनयाद्वारे हिंदीसह मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटामधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या शुभांगी लाटकर सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या अनेक फोटो व व्हिडीओद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच त्यांनी ‘शेकी’ गाण्यावर हटके डान्स व्हिडीओ केला आहे.

शुभांगी लाटकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

“एका ट्रेंडिंग गाण्याचा हा निव्वळ मोह आहे” असं कॅप्शन देत शुभांगी यांनी त्यांचा ‘शेकी’वरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या या डान्स व्हिडीओला १ लाख ३६ हजारहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे, तर १०० च्या आसपास चाहत्यांनी या शुभांगी यांच्या डान्सवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. चाहत्यांसह कलाकार मंडळींनीसुद्धा हा डान्स आवडला आहे.

“भारीच”, “किती छान”, “खूप मस्त”, “अशाच कायम आनंदी रहा”, खूपच छान डान्स केलात”,”वय हा फकर एक आकडा आहे” या आणि अशा प्रतिक्रियांद्वारे चाहत्यांनी शुभांगी लाटकर यांच्या डान्स व्हिडीओला दाद दिली आहे. दरम्यान, शुभांगी लाटकर या मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्री आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुभांगी लाटकर यांनी ‘बंध अनुबंध’, ‘रक्तसंबंध’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘पिंजरा’ यासारख्या वेगळ्या धाटणीच्या मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवाय ‘दिल्ली बेली’, ‘आशिकी २’, ‘सिंघम रिटर्न्स’ आणि ‘जॉली एलएलबी २’ हे हिंदी चित्रपटही त्यांनी केले आहेत. त्यांचा ‘घरत गणपती’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला.