मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘सनी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचाही चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळताना दिसत होता. मात्र चित्रपट प्रदर्शित झाला आणि अवघ्या एका दिवसातच या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. काही प्रेक्षकांना तर तिकिटाचे पैसे परत करून शो कॅन्सल झाले असल्याचं चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने सांगितलं. याबाबत हेमंतने संताप व्यक्त केला. त्याचबरोबरीने आता अभिनेता चिन्मय मांडलेकरनेही एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – अजय देवगणच्या ‘दृश्यम २’मुळे मराठी चित्रपटाचे शो रद्द? दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला, सरकारला विनंती करत म्हणाला…

मराठी प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट हेमंतने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे शेअर करत सत्य समोर आणलं. हे पाहून चिन्मयलाही राग अनावर झाला. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांचा पोस्टमध्ये उल्लेख करत त्याने संताप व्यक्त केला.

चिन्मय म्हणाला, “इतके दिवस ते म्हणत होते कि लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण? काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी चित्रपटसृष्टीतल्या निर्मात्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता पुन्हा त्यांच्याचकडे हे गाऱ्हाणं घालावं का?”

आणखी वाचा – Video : “टिकली लावायची की नाही हे बाईला ठरवू द्या” झी मराठी वाहिनीने ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच प्रेक्षक भडकले, म्हणाले, “हिंदू धर्म…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंतनेही राग व्यक्त करत सरकारला एक कळकळीची विनंती केली होती. प्रत्येक भागात मराठी चित्रपटाला हक्काचा शो व हक्काचा एक आठवडा मिळेल यासाठी कठोर कायदा आणावा अशी त्याने सरकारकडे विनंती केली. महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांबाबत घडणारा हा प्रकार खरंच विचार करायला लावणारा आहे.