मिताली मयेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच ती इंडोनेशियामधील बाली येथे फिरायला गेली आहे. अभिनेत्री सध्या तिच्या बाली ट्रिपचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने समुद्रकिनारी बिकिनी परिधान केल्याचा फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर कमेंट्स सेक्शनमध्ये अनेकांनी नाराजी दर्शवली.

हेही वाचा : ‘दार उघड बये’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावुक पोस्ट; म्हणाली, “मला…”

अभिनेत्रीने बिकिनीमधील फोटो शेअर केल्याने काही नेटकऱ्यांनी तिला मराठी संस्कृतीची आठवण करून दिली होती. या सगळ्या युजर्सला मितालीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे. समुद्रकिनारी आधी बिकिनी परिधान केलेल्या मितालीने आता साडी नेसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : इस्रायल-पॅलेस्टाईन पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं ‘ते’ जुनं ट्वीट होतंय व्हायरल; नेटकरी म्हणाले “गद्दार…”

मिताली या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, मी काहीही घातलं तरीही मी माझ्या मूळ संस्कृतीला कधीच विसरणार नाही. अभिमान आहे मला, मी मराठी असल्याचा आणि माझ्या मराठी संस्कृतीचा.”

हेही वाचा : Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ

mitali
मिताली मयेकर इन्स्टाग्राम कमेंट्स सेक्शन

मितालीच्या या व्हिडीओचं अनेकांनी कौतुक केलं आहे. “करारा जवाब”, “मस्त चपराक मारलीस स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच या व्हिडीओवरील बऱ्याच कमेंट्सला मितालीने जशाच तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.