अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी हे मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी लग्नगाठ बांधली. गेली अनेक वर्षे शिवानी आणि विराजस यांची मैत्री असल्याने विराजसच्या कुटुंबीयांशीही शिवानीचे लग्नाआधीच खूप छान बॉण्डिंग तयार झाले. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची अत्यंत लाडकी आहे. आता त्यांनी त्यांच्या नात्याबद्दलचं एक सिक्रेट उघड केलं आहे.

मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्या नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतात. याचबरोबर अनेकदा त्या विराजस-शिवानीबद्दलचं प्रेमही सोशल मीडियावरून व्यक्त करत असतात. सध्या त्या त्यांच्या आगामी ‘सरी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यानिमित्त त्यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत शिवानीबरोबर त्यांचं नातं कसं आहे हे सांगितलं.

आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”

“विराजसपेक्षा शिवानीवर तुमचं जास्त प्रेम आहे का?” असा प्रश्न विचारला गेल्यावर मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “मी आत्ता तेच ऐकून आले आहे. ‘लग्न झाल्यापासून माझ्याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही?’ असं मगाशीच विराजसने मला विचारलं. विराजस आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याला कोणीही भावंड नाही. त्यामुळे आई-वडिलांचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे असण्याची त्याला सवय आहे. म्हणून आता त्याला जरा असूया वाटते. आतापर्यंत आमच्या घरात मुलगीच नव्हती. त्यामुळे आता शिवानी आल्यावर मला खूप गंमत येतेय. आता दोन मुलं विरुद्ध दोन मुली अशा टीम झाल्या आहेत. नाहीतर आतापर्यंत मी एकटीच होते. त्यामुळे आता मी आणि शिवानी खूप मजा करतो आणि ते पाहून विराजस जेलस होतो.”

हेही वाचा : मृणाल कुलकर्णी आणि रितिका श्रोत्रीमध्ये आहे खास नातं; खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “ती विराजसच्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं नाव ‘फक्त महिलांसाठी’ असं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मृणाल कुलकर्णी जवळपास आठ वर्षांनी दिग्दर्शिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.