मराठी मनोरंजनसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची घोषणा करण्यात येत आहे. आता नुकतीच दमदार स्टारकास्ट असणाऱ्या एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी केली आहे. यामध्ये स्वप्नील जोशीसह तब्बल सहा अभिनेत्री एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर निर्माते-दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी ‘नाच गं घुमा’ या नव्या चित्रपटाची घोषणा करत याची पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘नाच गं घुमा’विषयी सांगताना दिग्दर्शक म्हणतात, “आज आम्ही जो चित्रपट करायला घेतला आहे. त्यासाठी झोकून देणारे, अभ्यासू आणि विचारी अशा कलाकारांची निवड आम्ही केली आहे. त्यांनी आपापल्या भूमिकांचा अभ्यास करून तालमीला सुरुवात केली आहे.” पुढे परेश मोकांशी यांनी हा चित्रपट नृत्यावर आधारित नाही असंही स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा : सैराट झालं जी! रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या फोटोंमुळे चर्चांना उधाण; नेटकरी म्हणाले, “आता…”

‘नाच गं घुमा’ चित्रपटात स्वप्नील जोशीसह मुक्ता बर्वे, सुप्रिया पाठारे, नम्रता संभेराव, सुकन्या मोने, शर्मिष्ठा राऊत, आशा ज्ञाते या सहा अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहेत. याशिवाय ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नवऱ्यासह ‘नाच गं घुमा’च्या निमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे.

हेही वाचा : “आम्हाला लग्न करायचं नव्हतं, पण…”, ‘अशी’ आहे आशुतोष राणा व रेणुका शहाणेंची फिल्मी लव्हस्टोरी, अभिनेते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नाच गं घुमा’ची निर्मिती परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्नील जोशी, तृप्ती पाटील, शर्मिष्ठा राऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे. दरम्यान, या नव्या चित्रपटाची घोषणा करताच नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. हा बहुचर्चित चित्रपट १ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.