scorecardresearch

Premium

“मी चाललो माझ्या खऱ्या आईला भेटायला…,” चैत्याचा निरागस अंदाज अन् भारावून टाकणारी दृश्य, ‘नाळ २’चा टीझर प्रदर्शित

Naal 2 teaser: ‘नाळ २’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे.

Naal 2 teaser

Naal 2 teaser: नागराज मंजुळेंचं नाव घेतलं की डोळ्यासमोर त्याचे वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट डोळ्यासमोर येतात. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘झुंड’, ‘नाळ’ हे त्याचे चारही चित्रपट तुफान गाजले. तर आता काही दिवसांपूर्वीच ‘नाळ’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. तर आज या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या चित्रपटात श्रीनिवास पोकळेने चैत्या, देविका दफ्तरदार यांनी त्याची आई आणि नागराज यांनी चैत्याच्या वडिलांची भूमिका साकारली होती. ‘आई मला खेळायला जायचंय’ या गाण्याने तर प्रेक्षकांवर जादूच केली. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा ‘चैत्या’च्या त्या निरागस भावविश्वात जाण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. या चित्रपटाचा शेवट बघता या कथानकामध्ये पुढे काय होईल असा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना पडला होता. तर आता ‘नाळ २’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचवली आहे.

sun transit in aries or mesh these zodiac sign get happiness and money surya gocha
ग्रहांचा राजा सूर्य करणार मेष राशीत प्रवेश! ‘या’ राशींना मिळेल नशिबाची साथ; आयुष्यात होईल प्रगती, मिळेल भरपूर पैसा
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
217 houses sold in Thane property fair
ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शनात २१७ घरांची विक्री
Chaturanga article The lives of widows still ineligible The life of a farmer widow is unremarkable Government
अजूनही अदखलपात्र विधवांचे जिणे!

आणखी वाचा : नागराज मंजुळे यांना मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार चोरीला, अनेक वर्षांनी खुलासा करीत म्हणाले, “त्या वेळी आम्ही…”

आज ‘नाळ २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीचरच्या सुरुवातील चैत्या कुठेतरी चालत जाताना दिसतो. तर नंतर वाटेल त्याला त्याची एक मैत्रीण भेटते आणि ती त्याला तू कुठे जात आहेस? असं विचारते. त्यावर चैत्या म्हणतो, “मी माझ्या खऱ्या आईला भेटायला चाललो.” त्यावर त्याची मैत्रीण त्याला विचारते, “मग तू परत कधी येणार?” त्यावर चैत्या म्हणतो की, “आता मी येतच नाही परत. मी चाललो.” तर टीझरच्या शेवटी चैत्या बसमधून प्रवास करताना दिसतो. या टीझर आता प्रेक्षकांच्या मनात भरला आहे. यावर कमेंट करत नेटकरी त्यांना हा टीझर आवडल्याचं सांगत या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

https://fb.watch/nvJYGCHJoi/

हेही वाचा : “मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही…” नागराज मंजुळे यांचं वक्तव्य चर्चेत

येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळे दिग्दर्शित हा ‘नाळ २’ प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी अधिकच धमाकेदार असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagraj manjule naal 2 teaser out and video gets viral know the details rnv

First published on: 06-10-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×