scorecardresearch

Premium

पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा! अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमकं काय काम करतो? जाणून घ्या

‘दगळी चाळ’ फेम पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

pooja sawant announces her engagement
पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल जाणून घ्या…

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईला सुरुवात झालेली आहे. मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे, अमृता देशमुख-प्रसाद जवादे, स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी या लोकप्रिय जोड्यांनंतर आता लवकरच ‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत विवाहबंधनात अडकणार आहे. इन्स्टाग्रामवर जोडीदाराबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत तिने साखरपुडा झाल्याची घोषणा केली.

अभिनेत्री पूजा सावंतने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अल्पावधीतच पूजाने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. ‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. आता अभिनेत्रीने आयुष्यातील एक नवा टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. “We are engaged…” असं म्हणत पूजाने होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.

pooja sawant and siddhesh chavan wedding rituals vhyahi bhojan
आली समीप लग्नघटिका! ‘असं’ पार पडलं पूजा सावंतचं व्याही भोजन, अभिनेत्रीच्या सासरी कोण-कोण असतं?
divya agarwal and apurva padgaonkar
दिव्या अग्रवाल झाली मराठी कुटुंबाची सून, तिचा पती आहे प्रसिद्ध उद्योजक, तर ती अभिनयाशिवाय करते ‘हा’ व्यवसाय
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”

हेही वाचा : ‘झिम्मा २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा! चार दिवसांत केली ‘एवढी’ कमाई

पूजाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा होणारा नवरा पाठमोरा उभा असून अभिनेत्री त्याला मिठी मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. पूजाने या पोस्टमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केलेलं नाही याशिवाय एकाही फोटोत अभिनेत्रीने त्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे हा मुलगा नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Pooja Sawant Engaged : “We are engaged…”, पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो समोर

पूजा सावंतच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे परंतु, तो कोणताही अभिनेता नसून ऑस्ट्रेलियातील एका कंपनीत कामाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. लवकरच हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पूजाची सख्खी बहीण रुचिरा सावंतने देखील लाडक्या ताईसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pooja sawant announces her engagement on instagram know more about her fiance job profession sva 00

First published on: 28-11-2023 at 13:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×