अभिनेत्री पूजा सावंतने २८ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधत वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेत्रीच्या लग्नाला मराठी मनोरंजनसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी उपस्थित होती. पूजाचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. त्यामुळेच अभिनेत्री लग्नानंतर काही दिवस परदेशात गेली होती. नुकतीच पूजा दीड महिन्यांनी भारतात परतली आहे.

आज महाराष्ट्र दिनानिमित्त खास पोस्ट शेअर करत पूजाने एक छानसा अनुभव तिच्या चाहत्यांना सांगितला आहे. पूजा लिहिते, “सर्वांना महाराष्ट्रदिनाच्या लाख लाख शुभेच्छा! माझी खूप इच्छा होती की मुंबईत असलेल्या घराप्रमाणेच, माझ्या ऑस्ट्रेलियाच्या घरात देखील छत्रपती शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असावी. लग्नापूर्वी ही इच्छा मी माझ्या टिमला अगदी सहजपणे बोलून दाखवली होती.”

हेही वाचा : महाराष्ट्र दिन : पारंपरिक साज, मुंबई दर्शन अन्…; मराठी कलाकारांनी स्वत:च्या आवाजात सादर केलं सुंदर गीत! सर्वत्र होतंय कौतुक

“माझ्या टीममधील मनोज ( आमचे spot दादा ) यांनी ही प्रतिमा मला आमच्या लग्नात भेट म्हणून दिली… आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने मी महाराजांची ही प्रतिमा ऑस्ट्रेलियाला आणली. अखेर आता छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ऑस्ट्रेलियालाच्या घरात सुद्धा विराजमान झाले आहेत. खूप खूप धन्यवाद मनोज!” अशी पोस्ट शेअर करत पूजाने ऑस्ट्रेलियाच्या घरचे काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा : ‘रमा-राघव’च्या सुखी संसारात नवीन विघ्न! ‘अग्गबाई सुनबाई’ फेम अभिनेत्याची मालिकेत होणार एन्ट्री, पाहा नवीन प्रोमो

पूजाने ऑस्ट्रेलियात महाराजांची प्रतिमा विराजमान करून आपली संस्कृती जपल्यामुळे तिच्या सगळ्याच चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ती शेवटची पुष्कर जोगच्या ‘मुसाफिरा’ चित्रपटात झळकली होती. आता अभिनेत्रीने चाहते तिला आागमी काळात आणखी नवनवीन चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा : Video : पोपटी साडी, नाकात नथ अन्…; ‘वाजले की बारा’ लावणीवर माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. सध्या पूजा लग्नानंतर सुखाने संसार करत आहे.