अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या अभिनेत्रीच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. व्याही भोजनानंतर पूजा-सिद्धेशच्या संगीत सोहळ्यासाठी संपूर्ण कलासृष्टी एकत्र जमली होती. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीच्या बहिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण यांचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अमृता खानविलकर, गौरी महाजनी, वैभव तत्त्ववादी, पुष्कर जोग, आदिनाथ कोठारे, चैत्राली गुप्ते व तिची लेक, अभिजीत व सुखदा खांडकेकर, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे व अभिषेक जावकर हे कलाकार या खास प्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! अखेर प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकर अडकले लग्नबंधनात, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…

पूजा-सिद्धेशच्या लग्नातील इनसाइड व्हिडीओ अभिनेत्रीची बहीण रुचिरा सावंतने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पूजाची बहीण “रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना…” या गाण्यावर डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या आईने देखील लाडक्या लेकीसाठी खास डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय पूजाचा भाऊ श्रेयस ‘गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी’ या जुन्या मराठी गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : सारा अली खानचा रेट्रो लूक पाहून नेटकऱ्यांना आठवली तिची आजी; म्हणाले, “ज्युनियर शर्मिला…”

पूजाच्या संगीत सोहळ्यातील अनेक इनसाइड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संगीत सोहळ्यासाठी पूजाने भरजरी लेहेंगा आणि त्यावर सुंदर असा नेकलेस परिधान केला होता. दरम्यान, पूजा व सिद्धेशचं लग्न अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं असून, हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.