scorecardresearch

‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट निर्मात्यांची घोषणा

‘धर्मवीर’चा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘धर्मवीर २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपट निर्मात्यांची घोषणा
'धर्मवीर २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. (File Photo)

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक आहे. ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता धर्मवीरच्या दुसर्‍या भागाची घोषणा करण्यात आली आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला २७ डिसेंबर २०२१ रोजी सुरुवात झाली होती. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने चित्रपटाच्या टीमकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कलाकार व चित्रपटाच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ‘धर्मवीर’च्या पुढील भागाची घोषणा चित्रपट निर्माते मंगेश देसाई यांनी केली आहे.

हेही वाचा>> “मराठी सिनेमांचं वेड लागू दे रे महाराजा”, संतोष जुवेकरचा व्हिडीओ चर्चेत

हेही वाचा>> “प्लीज तुनिषाला वाचवा” असं म्हणत रुग्णालयात शीझान खान रडत होता, डॉक्टरांचा खुलासा

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवास दाखविण्यात आला होता. या चित्रपटाच्या शेवटी त्यांचं निधन झाल्याचंही दाखविण्यात आलं होतं. त्यामुळे आता या चित्रपटाच्या पुढील भागात नेमकं काय दाखवले जाणार आहे, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. २०२४ मध्ये धर्मवीर चित्रपटाचा पुढील भाग प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>>सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याच्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीने शेअर केली पोस्ट, म्हणाली “पुढच्या वेळी…”

अभिनेता प्रसाद ओकने ‘धर्मवीर’ चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेचं फार कौतुक झालं होतं. तर क्षितीश दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 16:39 IST

संबंधित बातम्या