सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक प्रसाद ओक आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रसाद ओक लागोपाठ सुपरहिट चित्रपट देत आहे. अभिनयाबरोबर आपल्या दिग्दर्शनानेही प्रसादने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी ५०हून अधिक दिवसांसाठी लिक्वीड डाएट केलं होतं. याचा किस्सा अलीकडेच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितला.

काही दिवसांपूर्वी ‘मित्र म्हणे’ युट्यूब चॅनलला प्रसाद ओकने मुलाखत दिली. यावेळी प्रसादने ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी लिक्वीड डाएट का केलं होतं? याविषयी सांगितलं. तो नेमकं काय म्हणाला होता? जाणून घ्या…

हेही वाचा – “मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..

अभिनेता प्रसाद ओक म्हणाला, “मी खूप मांसाहारी प्रेमी आहे. पण ते दाढी, मिशी लावून खाता यायचं नाही. कारण मांसाहारी खायचं असेल तर दाढी, मिशी काढायला लागायची. परत ती लावणं म्हणजे पाऊण तास युनिटचा खोळंबा. जे मराठी चित्रपटांना परवडत नाही. जे माझ्या तत्त्वात बसत नाही की, माझ्यामुळे युनिट थांबलंय. त्यामुळे मी दिवसभर दाढी, मिशी आणि विग काढायचो नाही. चिकन खायला गेलो तर तो मसाला दाढेत लागणार, मिशीत लागणार, मग ते साफ करायला परत समस्या यायच्या. त्यामुळे मी पूर्ण लिक्वीडवर होतो. मी ५५ दिवस लिक्वीडवर होतो. शहाळ्याचं पाणी प्यायचो, ताक प्यायचो, फळांचा रस प्यायचो, काळी कॉफी प्यायचो. बसं.”

हेही वाचा – Video: शिल्पा शेट्टीला ‘तांबडी चामडी’ गाण्याची पडली भुरळ, अभिनेत्रीने केला हटके डान्स; नेटकरी म्हणाले, “ही वेडी झालीये काय?”

हेही वाचा – Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रसाद ओकच्या ‘धर्मवीर’च्या यशानंतर दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. २७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘धर्मवीर २’ चित्रपट आता ओटीटीवरदेखील प्रदर्शित झाला आहे. यानंतर प्रसाद अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘वडापाव’, ‘जिलबी’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘महापरिनिर्वाण’ , ‘रीलस्टार’ असे बरेच प्रसादचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.