Priyanka Chopra Marathi Movie : आजवर विविधांगी भूमिका साकारून प्रियांका चोप्रा जोनसने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. बॉलीवूडच्या या देसी गर्लने हॉलीवूडमध्येही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. २०१८ मध्ये प्रियांकाने हॉलीवूडमधील प्रसिद्ध गायर निक जोनसशी लग्न केलं. यानंतर अभिनेत्री परदेशात स्थायिक झाली. मात्र, कामानिमित्त आणि आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती आवर्जून भारतात येत असते. प्रियांका चोप्रा सध्या भावाचं लग्न आणि एका मराठी चित्रपटाच्या निमित्ताने भारतात आली आहे. या चित्रपटाबाबत जाणून घेऊयात…

प्रियांका चोप्राने पोस्टर शेअर करत नुकतीच तिच्या ‘पाणी’ या मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देसी गर्ल तिच्या कुटुंबीयांबरोबर या सोहळ्याला उपस्थित होती. एवढंच नव्हे तर तिने मराठमोळ्या आदिनाथ कोठारेसह माध्यमांसमोर एकत्र पोज देखील दिल्या. ‘पाणी’ चित्रपटाच्या निमित्ताने आदिनाथ आणि प्रियांका पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

प्रियांकाने ( Priyanka Chopra ) माध्यमांसमोर फ्लोलर प्रिंट व निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घालून उपस्थिती लावली होती. तर, आदिनाथने देखील मराठमोळा लूक करत तिच्याबरोबर पोज दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं. एका नव्या प्रोजेक्टनिमित्त या दोन्ही कलाकारांना एकत्र काम करताना पाहून नेटकऱ्यांनी प्रियांका चोप्रा व आदिनाथ कोठारे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : अरबाजने फोडली भांडी; बेडरुममध्ये केली तोडफोड! ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा; निक्कीची ‘ती’ गोष्ट खटकली

चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची कथा असणाऱ्या ‘पाणी’मध्ये आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्राकडून मराठी चित्रपटाची घोषणा ( Priyanka Chopra )

हेही वाचा : ‘बिग बॉस’ने तयार केल्या एकूण ६ जोड्या! सदस्यांसाठी अनोखा टास्क; निक्की-अभिजीत तर, अरबाजच्या जोडीला आहे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आदिनाथ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. अभिनेता याबद्दल सांगतो. “प्रियांका चोप्राबरोबर ( Priyanka Chopra ) काम करणं ही एक कमालीची गोष्ट आहे. माझ्या पदार्पणाच्या दिग्दर्शनात एवढी अप्रतिम टीम मिळणं हे माझ्यासाठी वरदान आहे. ‘पाणी’ लवकरच तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे आणि संपूर्ण टीमला विश्वास आहे की हा एक अनुभव असेल जो दीर्घकाळ प्रेक्षकांबरोबर राहील.”