दिवंगत ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. शनिवारी १५ जून रोजी पुणे जिल्ह्यातील आंबी गावात राहत्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. रवींद्र महाजनी मागच्या आठ महिन्यांपासून तिथे एकटेच राहत होते, तसेच त्यांचा मृतदेह सापडण्याच्या तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता, असं पोलिसांनी सांगितलं होतं.
कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?
फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने रवींद्र महाजनी यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला, त्यावेळी ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला याबद्दल माहिती दिली आणि रवींद्र यांचा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात ठेवला होता. गश्मीर तिथे आल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला होता.
हेही वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब
ससूनमध्ये त्यांचे शवविच्छेदन झाले आणि नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सोपविण्यात आला होता. १५ जुलै रोजी संध्याकाळी नवी पेठ येथील स्मशानभूमीत रवींद्र महाजनींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांच्या शवविच्छेदन अहवालाबद्दल माहिती समोर आली आहे. त्यांचा व्हिसेरा जपून ठेवण्यात आला असून तपास सुरू आहे, अशी माहिती तळेगाव दाभाडे येथील पोलिसांनी दिली आहे.