रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखचा ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित झाला. रितेशने या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. चित्रपट प्रदर्शित होऊन ३० दिवस उलटून गेले असले तरी ‘वेड’ची क्रेझ अजूनही कायम आहे. ‘वेड’ चित्रपटाला शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाचा फटका बसणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – ‘पठाण’ची चर्चा असतानाही ‘वेड’ चित्रपटाने जगभरात किती कोटी रुपये कमावले? रितेश देशमुखनेच सांगितली खरी आकडेवारी, म्हणाला…

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा बराच प्रतिसाद मिळत आहे. सहा दिवसांमध्येच या चित्रपटाने ६०० कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या काही आठवडे आधीच रितेशचा मराठी ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येत आहेत.

‘पठाण’चाच सगळीकडे बोलबाला असताना ‘वेड’ने आतापर्यंत जगभरात ७० कोटी ९० लाख रुपये इतपत कमाई केली आहे. तर देशभरात ५८ कोटी ११ लाख रुपये कमावले आहेत. ‘वेड’ला मिळत असलेलं यश पाहून रितेशची वहिनी म्हणजेच त्याचा भाऊ अमित देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं करायची काम अन्…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज आणखी एक सेलिब्रेशन आहे. तुम्ही पुढील यशाच्या शिखराच्या अगदी जवळ आला आहात.” असं अदिती देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट पाहून जिनिलीयाने थँक्यु वहिनी असं म्हटलं आहे. तर रितेशने त्याच्या वहिनीचे आभार मानले आहेत. ‘वेड’ चित्रपटाची ही कमाई खरंच अभिमानास्पद आहे.