रितेश देशमुख व जिनिलीया ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यांना प्रेक्षकांना ‘वेड’ लावलं आहे. रितेश-जिनिलीयाची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

रितेश-जिनिलीया गेली वीस वर्ष एकत्र आहे. दहा वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मनोरंजन विश्वातील एक आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रितेश देशमुखने एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या डेटिंग दरम्यानचा एक किस्सा सांगितला. ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेश व जिनिलीयाने भाडिपा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

हेही वाचा>>“माझी प्रेग्नन्सी अनपेक्षित होती, त्यामुळे…”, आलिया भट्टचं गरोदरपणाबाबत मोठं वक्तव्य

हेही वाचा>>…म्हणून रितेश देशमुख मराठी चित्रपटांत लावतो वडिलांचं नाव, कारणही आहे खास

रितेश म्हणाला, “जिनिलीया व मी तेव्हा लॉंग डिस्टंस रिलेशनशिपमध्ये होतो. शूटिंग संपल्यानंतर आम्ही रात्री फोनवर गप्पा मारायचो. तेव्हा जिनिलीया माळशेजमधील एका गावात शूटिंग करत होती. आम्ही गप्पा मारत असताना ‘दूर राहा, जवळ येऊ नकोस’, असं म्हणत होती. मला कळलंच नाही. मी तिला विचारत होतो जिनिलीया काय झालं? नंतर मला कळलं की तिच्या रुममध्ये पाल होती आणि ती पालीशी बोलत होती”. रितेशने जिनिलीयाचा भन्नाट किस्सा सांगितल्यानंतर एकच हशा पिकला.

हेही वाचा>>तमन्ना भाटिया करतेय ‘डार्लिंग’ फेम विजय वर्माला डेट? किस करतानाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेड’ चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. तर जिनिलीयाचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने १० कोटींचा गल्ला जमवला आहे.